कै. डाॅ.लता रानडेच्या स्मरणार्थ

नमस्कार मंडळी,

१५ जून२०१९ (शनीवार) रोजी संध्याकाळी मंडळांने Health Awareness चे सेमिनार आयोजित केले होते.
जवळ जवळ दोन तास डाॅ. आचार्य यांनी योगा व मेडिटेशनवर माहितीपूर्वक संभाषण करून उपस्थित मंडळीना खूप आनंद दिला. या बद्दल त्यांचे व मंडळाचे आम्ही आभारी आहोत.

Health Awareness चे पहिले सेमिनार १९९८ मधे कै.डाॅक्टर लता रानडे ह्यांनी मंडळात सुरू केले होते. मधे कमिटी बदलल्या मुळे कांही वर्षे ते बंद पडले होते. ते त्यांनी २०१३मधे परत सूरू केले व ते चार वर्षे अव्याहत चालू होते. डाॅक्टर रानडे स्वतः जी.पी होत्याच.

पण त्यांनी स्वतः आणि त्यांच प्रमाणे इतर health personnel म्हणजेच consultants, health visitors, nurses, physiotherapists, psychologists etc तज्ञांना जमवून ही सेमीनार घेत. तज्ञांच्या ज्ञानाचा मंडळाच्या सभासदांना उपयोग व्हावा व प्रत्येकाला खाजगी आरोग्या बद्दल बोलतां यावे हा त्यांचा त्यामागील हेतु होता.

ह्या वर्षीच्या सेमीनारला कै. डाॅ. लता रानडे ह्यांचे यजमान ( उल्हास रानडे) नेहमी सारखे उपस्थित होते.
त्यांनी डाॅ.रानड्यांच्या स्मरणार्थ मंडळाला चविष्ट पदार्थ स्पाॅनसर केले. ते मंडळाचे ह्या संधी बद्दल आभारी आहेत.

मंडळ ह्यापुढेही असेच कार्यक्रम आयोजित करून मंडळाच्या सभासदांना आनंद देतील ही खात्री आहे.

आपली

डाॅ. नीला वि. किबे