Feedback
दान
वेल्कोमे   लोगिन or   नई सदस्य पंजीकरण
अपनी भाषा चुनें:
 • ENGLISH
 • |
 • मराठी
 • महाराष्ट्र मंडल लंदन में आपका स्वागत है
  सुस्वतागम! महाराष्ट्र मंडळातर्फे आपले मनापासून स्वागत!!!
   
  पाया भक्कम असला की वास्तू मजबूत! महाराष्ट्र मंडळाच्या बाबतीत असेच काही आहे. सन १९३२ साली लंडनमध्ये राहणाऱ्या महाराष्ट्रीयन लोकांना एकत्र आणण्यासाठी या मंडळाची स्थापना झाली.  गेली तब्बल ८० वर्षे हे मंडळ 'इथे इंग्रजीचे नागरी' मराठीची ज्योत तेवत ठेवीत आहे. मराठी जाणीव आणि संस्कृतीची भावना वृन्धींगात करीत आहे. घरापासून...आपल्या मातृभूमीपासून दूर असलेल्या मराठी जनतेला आपली संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी मंडळातर्फे एक अमूल्य संधी प्राप्त झाली. 
  यंदा ८० वर्षाचे औचित साधून मंडळाने नवीन बोधचिन्ह स्वीकारले आहे. आपण इथे दैनदिन जीवनात जतन केलेल्या आणि वृन्दिंगात केलेल्या मराठी जाणिवांचा जल्लोष तुतारी फुंकून दोन मावळे करीत आहेत. या बोधचिन्हाच्या मध्यभागी जगप्रसिद्ध ऐतिहासिक टोवर ब्रीद्ज आहे. टोवर ब्रीद्ज हे लंडनचे एक महत्वाचे प्रतिक आहे. लंडनमधील बहुभाषिक आणि भिन्न समाजव्यवस्थेत मराठी माणसाने आपला पाय सफलतेने रोवला. येथील समाजात मिसळताना आपली कला- संस्कृती यांचा विसर होऊ दिला नाही...किंबहुना, या भिन्न समाजाशी सुंदर मिलाफ साधला. आज २०१२ मध्ये लंडन ओल्य्म्पिक्चे यजमानपद भूषवित आहे. मंडळाच्या या नव्या बोधाचीन्हाद्वारे भिन्न कला - संस्कृती यांचा मिलाफ प्रतीत होत आहे.