Feedback
Donate
Welcome   Login or   New Member Registration

Maharashtra Mandal London proudly support screening of Lokmanya Ek Yugpurush

Thursday, 26 March 2015 from 18:15 to 20:30 (GMT) The Nehru Centre 8 South Audley Street W1K 1HF London United Kingdom

CLICK HERE TO BOOK FREE TICKETS

Lokmanya Ek Yugpurush

Abhinay 2015

For more details regarding Abhinay 2015 only please contact Ajinkya Bhave on 07799642504 Or Amol Pargaonkar on 07540396135.


मंडळाच्या नाटकासाठी कलाकार पाहिजेत.

गेल्या काही वर्षात मंडळाच्या सभासदांनी दोन किंवा तीन अंकी नाटक सादर केलेलं नाही. तसं एखादं नाटक पुढच्या वर्षी सादर करण्याची शक्यता आहे का अशी काही उत्साही सभासदांनी विचारणा केली आहे. नाटक सादर करण्यास मंडळाची तयारी आहे. पण तो विचार अंमलात आणण्यासाठी सर्वप्रथम गरज आहे ती उत्साही सभासद / कलावंतांची. ज्यांना नाटकात काम करण्याची हौस आहे त्यांनी आपली नांवे, वय, इमेल किंवा टेली. नंबर शक्य तितक्या लौकर श्री. अरूण मंत्री यांना कळवावी. नाटक कुठलं करावं हे किती कलाकार मिळतात त्यावर अवलंबून आहे. नाटकात काम करण्याचा पूर्वीचा अनुभव असला पाहीजे अशी अजिबात अट नाही. फक्त उत्साह आणि श्रम करण्याची तयारी हवी. ज्यांनी मंडळाबाहेरच्या नाटकात किंवा एकांकिकेत कामे केलेली असतील, त्यांनी त्यांच्या अनुभवाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. ज्यांना नाटक किंवा एकांकिका दिग्दर्शन करण्याचा अनुभव असेल किंवा इच्छा असेल त्यांनीही श्री. मंत्रींशी संबंध साधावा. ज्यांना अनुभव असेल त्यांनी त्या अनुभवाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी.
अरूण मंत्री यांचा ईमेल पत्ता arun35ind@hotmail.co.uk


EMS 2016 युरोपातल्या मराठी लोकांचा मराठमोळा सोहळा म्हणजेच युरोपिअन मराठी संमेलन! मराठी कलासृष्टीतील आपल्या आवडत्या कलाकारांची साथ आणि संपूर्ण युरोप येथील इच्छुक कलाकारांच्या कलेला वाव मिळवून देणारं एक आगळ वेगळ मराठी संमेलन. यंदा तिसऱ्यांदा हॉलंड येथे सादर होणार आहे EMS, (तत्पूर्वी १९९८ आणि २००६ साली हॉलंडने EMS चे यजमान पद भूषविले आहे) एका नव्या स्वरुपात, तरुणाईच्या जल्लोषात, विविध कार्यक्रमांसोबत, पारंपारिक डच आदरातिथ्यासोबत आणि अस्सल मराठी पदार्थांसोबत.
दिनांक : १५, १६, १७ एप्रिल २०१६
स्थळ : थिएटर हॉटेल अल्मलो
अधिक माहितीसाठी: http://www.ems2016.nl
Lagna Kartavya
 
Maharashtra Mandal London is most Grateful for your Generous Donation!